Monday 29 July 2013

फेसबुककरांची दिंडी वर्ष ३ रे | A Virtual Dindi

जय हरी मित्रानो ,



                       फेसबुककरांची दिंडी वर्ष ३  रे (https://www.facebook.com/events/143949362455251) म्हणजे फक्त गेल्या तीन वर्षात मी अनुभवलेली वारीची तीन वर्ष. वारीतला अनुभव शब्तात मांडण तसं अवघडच कारण  तो अनुभव फक्त अनुभावायचा असतो, असो अशा भक्तांसाठीच तर आहे आपली "फेसबुककरांची दिंडी ".  "एकदा तरी वारी अनुभवावी" असं कितीदा तरी ऐकलं असल तुम्ही. तसं हे वाक्य मीही अनेकदा ऐकलं होत पहिल्यांदा वारी करण्याअगोदर. वारीची परंपरा माझ्या आजोबा... वडिलांपासून चालत आलेली मी पाहिलीये. वडिलांनी तर संपूर्ण पालखी सोहळ्याचं नेतृत्व हि केलंय अनेक वर्ष.  आई नेहमी म्हणायची  " एकदा जाऊन ये मग बग दर वर्षी जायचं असं म्हणशील !! "  दर वर्षी प्रमाने याही वर्षी संपूर्ण वारी जगातील भाविक भक्तांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा अस ठरवलं होत.

          सुमारे २ महिने अगोदर फेसबुक करांच्या दिंडीच Planning चालू झालतं. या वर्षी काहीतरी वेगळ करायचं असा मनात विचार होताच. चांगल्या कामासाठी माणसं आपोआप भेटतात , असाच एक मित्र आणि नंतर जिवलग झालेला अक्षय जोशी (www.facebook.com/akkshay.joshi). अक्षय एक उत्कृष्ठ कलाकार आहेच आणि ती कला आपल्या दिंडी साठी वापरायची त्याची इच्छा होती. त्यामुळेच आपण बनवलेला हा आपल्या दिंडीचा लोगो आणि इतर डिझाईन साकारली. जी सर्वांनाच खूप आवडली. फेसबुक तर संपूर्ण भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

            या वर्षीच वैशिष्ठ्य सांगायच झाल तर, सन १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे त्रितीय चिरंजीव नारायण महाराजांनी सुरु केलेला पालखी सोहळा काही कारणास्तव १८३२ ला वेगळा झाला. म्हणजे १६८५ पासून नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका जेष्ठ वद्य सप्तमीला पालखीत घेऊन आळंदी ला निघत असत. अष्टमीला आळंदी क्षेत्री पोहोचल्यावर  तिथून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्याच पालखीत ठेवून पंढरपुरास जात असत. कारण काही असो हा वेगळा झालेला पालखी सोहळा Virtually का होईना आपण एकत्र आणि शकतो असा विचार मनात आला. त्यातच सर्वात मोठी साथ मिळाली ती काही वर्षांपूर्वी फेसबुक वरूनच ओळख झालेल्या प्रज्ञेश शैलेजा ज्ञानेश्वर मोळक (www.facebook.com/saaku.molak) म्हणजेच साकु ची . गेल्या दोन वर्षांपासून तोही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी बरोबर वारी Cover करत होता. आमची हि भेट किवा मैत्री एक दैवी घटनाच असावी अस वाटत कधी कधी. मग काय दोन्ही पालख्यांचे अपडेट्स देण्यासाठी आम्ही सज्ज झालो.

               पालखी म्हंटलकि जवळपास २० दिवस सुट्टीची गरज असते, कस कोण जाणे  पण मला २० दिवसाची सुट्टी ऑफिस मधून मंजूर करून घेण्यात काहीच अडचन आली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली हि दिंडी एक आभासी दिंडी आहे परतू तरीही मला अनेक जणांचे फोन आले आणि तुमच्या बरोबर वारी करायची इच्छा आहे अशी अनेकांनी इच्छा  व्यक्त केली. आपल्या पुढील वाटचालीत याबाबत नक्कीच विचार करू.

             दिनांक २९ जून रोजी तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार होते, सकाळी लवकर उठून मी मंदिरात गेलो थोडा परिस्थितीचा अंदाज घेतला. सगळीकडे भक्तांचा महासागर. कानावर फक्त विठूनामाचा गजर. प्रसार माध्यमांचे प्रतीनिधी त्यांचा Set Up करण्यात व्यस्त होते. हळू हळू दिंड्या मंदिरात येण्यास सुरवात झाली तसा तसा वातावरणात उत्साह वाढत होता. मंदिरात फुगड्यांचे खेळ रंगत होते. हौशी  कॅमेरामन इकडून तिकडून काही चांगला फोटो भेटतोय का याच धडपडीत दिसत होते. मीही अधून मधु अशा नवख्या मित्रांना थोडं मार्गदर्शन करीत होतो. अधून मधून वरूण  राजाही आपली उपस्थिती दाखवत होता. दुपारी ४ च्या सुमारास तुकोबांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले . प्रस्थानानंतर पालखी मंदिराजवळच असलेल्या इनामदार वाड्यात एका दिवसाच्या मुक्कामासाठी पोहोचली.  त्यानंतर दुसया दिवशी देहूकरांनी पालखीला अतिशय उत्साही वातावरणात तुकोबांना निरोप दिला. पालखी गावातून बाहेर पडताच पहिली अभंग आरती होते ती अनगडशावली बाबांच्या दरग्यावर. इथे महाराजांच्या … " भेदाभेद भ्रम अमंगळ " या अभंगाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
   

             पुढे पालखी मजल दरमजल करीत दुसया मुक्कामाच्या दिशेने म्हणजेच आकुर्डी कडे वाटचाल करते. वाटेत शनि मंदिर चिंचोली  इथे अभंग आरती देखील होते. तिथीच्या ऱ्हासावर अवलंबून असलेला पिंपरी चा मुक्काम आणि गोल रिंगण या वर्षी नव्हता म्हणून पिंपरी -  चिंचवडकर थोडे नाराज होते. शेवटी गोल रिंगण पाहायला मिळण हि एक पर्वणीच. आकुर्डी नंतर पालखी थेट पुण्याकडे निघाली. पुणेकरांचा पाहुणचार आणि स्वागत करण्याची पद्धत याबद्दल मी काय वेगळे सांगावे. पुण्य नगरीत नेहमी प्रमाणे  जंगी स्वागत झाले. फर्गुसन रोड वरील दृश्य तर डोळ्यात साठून ठेवण्यासारखे होते. पुण्यातील निवडूंगा विठ्ठल मंदिरातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी पुढच्या मुक्कामी म्हणजे लोणी काळभोर कडे मार्गस्त झाली. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोहचल्यावर समाज आरती होते. सर्व दिंड्याचे विणेकरी त्यात हजार असतात. दिवसभर कितीही चलो असलो तरी समाज आरती नंतर आपण किती चाललोय हे पण आठवत नाही. समाज आरती झाल्यावर चोपदार दुसर्या दिवशीच्या वाटचालीसाठी सूचना करतात, तसेच हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंबाबत माहिती दिली जाते आणि जो तो आपल्या वस्तू घेऊन जातो. लोणी काळभोर नंतर पालखी यवत, वरवंड असे मुक्काम करत पोहोचते उंडवडी गवळ्याची गावी. वाटेत लागतो तो रोटी घाट. घाटातून पालखी व्यवस्थित पुढे जावी साठी गावकरी अनेक बैजोड्या रथाला जोडण्यासाठी आणतात. उंडवडी नंतर पालखी पोहोचते बारामती येथे. बारामतीकर हि पालखीचे उत्साहात स्वागत करतात. बारामातीवरून निघाल्यावर वाटेत काटेवाडी मध्ये विसावा असतो , काटेवाडी मध्ये पालखीचे शुभ्र वस्त्राच्या पायघड्यानी  पालखीचे स्वागत करण्याची प्रथा आहे. पालखी गावातून बाहेर आल्यावर वेशिजवळच मेंढ्याचे रिंगण होते.  बारामती आणि सणसर मुक्कामानंतर दिवस आला  तो पहिल्या गोल रिंगणाचा, ज्याची मी आतुरतेने वात पाहत होतो. अन्थुर्ने गावी पोहचन्याअगोदर सकाळी लवकर बेलवाडी येथे पार पडले गोल रिंगण.  ग्रामस्थांनी पूर्वीपेक्षा जास्त जागा रिंगणासाठी उपलब्ध करून दिल्याने अभूतपूर्व असे गोल रिंगण बेलवाडीत पार पडलं. नंतर अन्थूरणे ग्रामस्थांनी नेहमीप्रमाणेच जंगी स्वागत केले. त्यानंतर निमगाव केतकीचा मुक्काम करून पालखी पोहोचली इंदापूर शहरात. जिथे सर्वच इदापुरकर गोल रिंगणाची आतुरतेने वाट  पाहत होते. माझ्या वैयक्तिक मते गोल रिंगण पाहावे तर इंदापुरचेच . या वर्षी मला काही चांगले फोटोज मिळाले . भाविकांच्या प्रतिक्रियांमधून मला हे समजले. काही वृत्तपत्रांमधेही  आपल्या दिंडीचे फोटो प्रसिद्ध झाले हे पाहून अभिमान वाटतो. इंदापूर मधे या वर्षी दोन दिवस मुक्काम होता, वारकर्यांना काहीसा आराम मिळाला. आणि मलाही निवांतपणे अपडेट्स देता आले. पुढे सराटी गावातील मुक्काम होता, मुक्क्मानंतर दुसर्या दिवशी जेव्हा पालखी अकलूज कडे निघते तेव्हा सकाळी तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येते. या वर्षी मला हा कार्यक्रम व्यवस्थित टिपता आला.

          सराटी गावातून पालखी पुढे जाण्याअगोदर गावातील कोळी समाजाच्या बांधवांचा सन्मान केला जातो , याचे कारण असे कि  जेव्हा या गावातून नदीवरून पलीकडे जायला जेव्हा पूल नव्हता तेव्हा ह्या कोळी समाजातील लोक संपूर्ण पालखी त्यांच्या होड्यांमधून पलीकडे सुखरूप पोहचवत असत. कालांतराने पूल तयार झाल्याने हि प्रथा बंद झाली.



               पुढे अकलूज मधील माने  विद्यालयात रंगणारा गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी सर्वानीच गर्दी केली होती. मलाही काही वेगळ्या Angles  ने  या रिंगणाचे फोटो घ्यायचे होते. सकाळी माने  विद्यालयात पोहोचलो तर सगळीकडे फक्त पाणी आणि चिखल. परतू तरीही तिथल्या प्राचार्यांनी सर्व पाणी काढून दिले आणि अखेर रिंगण व्यवस्थित पार पडले.  अकलूज नंतर माळीनगर ला तुकोबांच्या पालाखीतले पहिले उभे रिंगण पार पडले. बोरगाव च्या मुक्कामानंतर पालखी निघते ती पिराच्या कुरोली कडे. वाटेत तोडले बोडले येथे विठ्ठलाचा धावा होतो . धावा म्हणजे तुकोबांना वारी करताना पंढरीची ओढ लागली असताना या ठिकाणाहून पंढरपुरातील मंदिराचा कळस दिसला असता त्यांनी विठ्ठलाचा धावा केला. पालखी सोबत सर्वजण बेभान धावतात या धाव्याला. पिराची कुरोली मुक्कामानंतर पालखी पोहोचली वाखरी ला. जिथे जवळपास २५० छोट्या मोठ्या पालख्या एकत्र येतात. वाखरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपुढे देहुकरांचे कीर्तन असते. अशी परंपराच आहे. भर पावसात कीर्तनाला सुरवात झाली, तरी सर्वजण जागेवरच होते. आम्हीही पावसातच भिजत होतो. विठ्ठल नामात आणि नामस्मरणात किती शक्ती असते याची प्रचीती मला त्या दिवशी पुन्हा एकदा आली. कारण कीर्तन चालू होताच काही वेळातच पाऊस थांबला. मोठ्या उत्साहात वारकर्यांनी  जयघोष केला.


       
                  वाखारीतील मुक्क्मानंतर पालखी पोहोचली ती पंढरीत. सर्वच वारकर्यांना विठ्ठलाच्या भेटीची आस लागली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होत. पालखी सोहळा हा फक्त एका विशिष्ठ धर्माच्या किंवा जातीच्या संधर्भातून साजरा होणारा उत्सव नव्हे. सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला एकोप्याने वारीत चालताना दिसतील . वारीतून शिकण्यासारख खूप काही आहे। या तर मग एकदा वारीत सहभागी होऊन पहाच.

आभार : आपल्या या उपक्रमात सर्वच वृत्तपत्रांनी (सकाळ, लोकमत, लोकसत्ता , महाराष्ट्र टाईम्स , दिव्य मराठी , दैनीक जागरण सिटी प्लस , तरुण भारत , टाईम्स ऑफ इंडिया , इंडिअन Express ), वाहिन्यांनी (आयबीन लोकमत, झी २४ तास , मी मराठी , साम मराठी, T V ९ महाराष्ट्र ) आपल्याला जी साथ दिली त्याबद्दल सर्वांचेच आभार. याच बरोबर आपल्याला आपल्या या अभिनव उपक्रमात नेहमीच साथ देणारे आकाश चटके , श्याम ढोली , शैलेश मोळक , पवनराज पाउलबुद्धे , श्रींराम बडवे या सर्वांचेही आभार. नजरचुकीने एखादे नाव राहून गेले असल्यास क्षमस्व. 













आपला ,
स्वप्नील राम मोरे ,
देहू , पुणे
(
https://www.facebook.com/swapnilmore7077)
https://www.facebook.com/TukaramMaharajDehuwww.SantTukaram.com

Friday 6 July 2012

वारी माझ्या नजरेतून


          या वर्षी फेसबुक करांच्या दिंडीच दुसरं वर्ष होतं , मी मागील वर्षी प्रमाणे "फेसबुक करांची दिंडी " (https://www.facebook.com/events/349630685096756) असा इवेंट बनवला आणि आपल्या मित्रांना आमंत्रित केले , त्यांनीही त्यांच्या मित्रांना आमंत्रित करून हा इवेंट संपूर्ण जगात पोहचावा यासाठी मला मदत केली. मागच्या वर्षीच्या  साध्या मोबाईल फोनची जागा या वर्षी महाराजांच्या कृपाशीर्वादाने मिळालेल्या नोकरीतून घेतलेल्या प्रोफेशनल कॅमेऱ्याने घेतली होती, त्यामुळे या वर्षीचा पालखी सोहळा हाय डेफिनिशन कॅमेऱ्यातून पाहण्याचा आणि तो भाविकांना दाखवण्याचा आनंदच वेगळा होता.


वारीच्या आगदी पहिल्या दिवसापासून मी आणि माझा कॅमेरा दोघेही वारीतील अप्रतिम असे क्षण टिपण्यासाठी सज्ज असायचो , सोबत फोटो अपलोड करण्यासाठी छोटासा संगणक. वारीत सर्वात पुढे  , मग चौघडा गाडी असते  त्यानंतर चालणारे रिंगणातील अश्व, अब्दागिरी वाले,   रथाच्या पुढे चालणाऱ्या ४०-५० दिंड्या , पूर्वी सर्व दिंड्या महाराजांच्या रथाच्या मागेच चालत असत पण आता काही उत्साही दिंड्या पुढे चालतात . मग रथाच्या मागे प्रचंड असा जनसमुदाय , जवळपास २५० दिंड्या , प्रत्येक दिंडीत पताकाधारी , तुळस डोक्यावर घेतलेल्या तुलासिधारी महिला , तसेच काही दिंड्यात डोक्यावर हंडा किवा कळशी घेतलेल्या महिलाही असतात , प्रत्येक दिंडीत दिंडीतील शिस्त राखणारा लाल कपड्यातील एक चोपदार असतो .
महाराजांच्या पालखीचा एक मुख्य चोपदार देखील असतो , पालखी कुठे कधी थांबर , कधी निघणार याच्या सूचना तोच देतो . पालखी रथाला जुपलेल्या बैलांची निवड त्यांच्या डौलदार आणि काटक   क्षमतेवरून केली जाते  , बऱ्याच बुद्धिवाद्यांचा रथाला बैल जोडण्यास आक्षेप आहे परंतु , परंपरा ती  परंपराच .

वारीतील सर्वात सुखद आनंद म्हणजे रिंगण , रिंगणाचे दोन तीन प्रकार आहेत  गोल रिंगण, उभे रिंगण , काटेवाडीत होणारे मेंढ्यांचे  रिंगण अगदी विलक्षण  . रिंगण म्हटले कि सगळ्या वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारतो . गोल रिंगणाच्या वेळी रिंगणात धावण्याची मजा एकदा तरी अनुभवावी .

पुढे तोंडले - भोंडले  येथे होणारा विठ्ठलाचा धावा , तिथून पंढरपूरच्या विठ्ठल  मंदिराचा कळस दिसतो असे म्हणतात , म्हणून सर्वजण पालखी  सोबत जवळपास २-३ किलोमीटर धावतात . "तुका म्हणे धावा | आहे पंढरीत विसावा || ".

वारीत अनेक मित्र भेटले , लहान थोर पण कुणीच कधी आपल्या मोठेपणाचा किवा आपल्या लहान असल्याचा दाखला देत नाही आणि त्याची गरजाही नसते , हि वारी हेच सगळ्याच्या आयुष्याची पुंजी असते .

-जय हरी
स्वप्निल राम मोरे , श्री क्षेत्र देहूगाव .